तुमच्या माझ्यातली ती
तुमच्या माझ्यातली ती
ती एक साधीशी, सरळ,सूंदर
स्वतःमध्येच मग्न असणारी
मोजकच बोलणारी, लोभस हसणारी
उराशी खूप स्वप्न बाळगणारी
अन स्वप्नातच जगणारी
फार अपेक्षा नसणारी
छोट्या विश्वातही समाधानी राहणारी
तीच घरच सारं तिचं जग असणारी
या जगासाठी सगळं काही त्यागणारी
अन वेळ आल्यास हवं ते करणारी
एका वळणावर नव्या घरात पाऊल ठेवणारी
अन प्रेमाने घर बांधणारी
आईपणासाठी कळा सोसणारी
अन मुलाच्या बालपणासाठी करिअरही मागे सोडणारी
घराचं वात्सल्य जपणारी
अन घरावर संकट आल्यास दुर्गा अवतार घेणारी ती
ती असते जोडीदाराचा कणखर आधार
तिच्याशिवाय नाही होत सुखी संसार
तीच असते वृद्धापकाळातली काठी
अन मुलांची सावलीही तीच
ती असते सगळ्यांचा अभिमान
प्रसंगी तिला गहाण ठेवावा लागतो स्वाभिमान
ती आहेच अनाकलनीय
ती आहेच अदभूत
आहे ती तुमच्या माझ्यातली ती