STORYMIRROR

Nalanda Wankhede

Inspirational

3  

Nalanda Wankhede

Inspirational

तुमची अर्धांगिनी

तुमची अर्धांगिनी

1 min
1.1K


डोळ्याला डोळे भिडले आणि तुम्ही थेट मनात शिरले

स्वप्नपरी स्वपनामधली मी अर्धांगिनी झाले

कळलेच नाही मला हे कसे आपसुकचं घडले

राज्याची राणी होवुन सख्या तुझीया दारी आले


सागरकिनारी स्वप्नलहरीवर झोकावत

हाथ तुझीया हाथी दिला

समर्पूण तन मन धन स्वाधीन केले तुला

ह्या वेलीचे फूल करावे बहरून यावे ही अंतरीचि इच्छा

प्रेमाचे नित नवीन चांदणे शिंपावे,सुंगधावे रातरानीने हीच मनी सदिच्छा


सुखदुःखांचे आपण सोबती,

जीवनगीत दोघेही मिळुनी गावे

कांटे येवो की फूल वाट्याला

मागे वळूनी ना पहावे


जीवन आपुले फुलवून, सामाजिक बांधीलकी ही जोपासु

नात्यागोत्याचा हा गोतावळा मिळुनी

दोघे ही सोडवू

आपण दोघे एकच अपत्य आपले मंत्र जगाला देवु

कर्तुत्वाची घेवून शिदोरी कर्तव्य पार पाडू


दोन शरीर एक जीव एक प्राण आपुले

घेऊ सत्याचे खडतर निर्णय झाले जग जरी शत्रु आपुले

मुलामुलीत फरक करु ना हेच वचन दिधले

आईबापांची सेवा करु असो माझे किंवा तुझे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational