STORYMIRROR

Nalanda Wankhede

Inspirational

4  

Nalanda Wankhede

Inspirational

तुलना

तुलना

1 min
644



नका करू तुलनात्मक व्यवहार

प्रत्येकाचं असतं एक वैशिष्ट्य

अंगी भिनतो तुलनेने न्यूनगंड

केलेला प्रत्येक प्रयत्न आहे सर्वश्रेष्ठ


थेंब थेंब अखंड पाण्याच्या माऱ्याने

फुटतो दगडालाही पाझर

तुलनेच्या घातक सवयीने

साचत जाते मळाची घागर


साशंक वृत्तीने पाहणे सर्वांना

मनाची आहे कोरी कल्पकता

खचतो तुलनेने आत्मविश्वास

तुलना ही दुर्बळ मनाची वैधता


प्रत्येक व्यक्ती नवी संकल्पना

सांडतात तराजू मधून यातना

तुलनेने भावनांचा मांडला बाजार

पडती कोलमडून निरागस चेतना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational