तुला पाहता कळले ...
तुला पाहता कळले ...
तुला पाहता कळले ,
सुख काय असते ,
स्वर्गही नको मला ,
तुझ्या सवे ते जगते ...
जरी वाटेत खाचखळगे ,
तमा ना मला वाटते ,
हात तुझा धरता हाती ,
भीती माझी दूर पळते ...
हिच साथ तुझी ,
जगण्याची हमी देते ,
विश्वास तुझ्या माझ्यातला ,
हेच तर प्रेम असते ...
तळमळ मनाची ही ,
दुरावा क्षणाचाही नको असते ,
तू राहावा समोरी ,
मी तुझ्यात वसते ...

