Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Inspirational

3.6  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Inspirational

तुला काहीतरी सांगायचं आहे

तुला काहीतरी सांगायचं आहे

1 min
410


तुला भेटायचं आहे

कमी दिवसात इतका खास कसा , 

 विचारायचं आहे..!!


तुला स्पर्श करायचा आहे

इतका गोड आहेस तरी कसा , 

जाणून घ्यायचं आहे..!!


हे नातं कसं दृढ आहे

त्याचा नेमका तपशील असेल कसा , 

मला जाणून घ्यायचं आहे..!!


प्रत्यक्ष बघुन प्रेमात पडायचं आहे

तु नेमका आहेस तरी कसा ,

तुला विचारायचं आहे..!!


प्रत्येक गाण्याचा अर्थ विचारायचं आहे

इतका सुमधुर गातो तरी कसा ,

हे प्रत्यक्ष अनुभवायचं आहे..!!


कोणी ना कोणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे

तु सगळ्यां पेक्षा वेगळा कसा ,

हे तुला सांगायचं आहे..!!


बोलू ना बोलू ती धडधड ऐकायची आहे

प्रत्येकवेळी आगळा कसा ,

तुझ्या डोळ्यात पहायचं आहे..!!


तुला डोळ्यात साठवायच आहे

हृदयाच्या तळाशी तू असशील तसा ,

आयुष्यभर जपून ठेवायचं आहे..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama