STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Drama Children

4  

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Drama Children

मम्मा माझं जग

मम्मा माझं जग

1 min
0

मम्मा ह्या शब्दात माझं सगळं 

जग विसावल आहे..

ती आहे म्हणून माझ्या 

जगण्याला अर्थ आहे..


तिने शिकवलेली प्रत्येक गोष्ट 

आता खुप काही शिकवत आहे..

ती म्हणायचा प्रत्येक शब्द आणि

शब्द खरे होताना दिसत आहे..


कळलंच नाही पण मी तिच्या 

सारखी बनत चालली आहे..

फोन वरच बोलणं सासरी 

मनाला उभारी देणार आहे..


तिची आठवण येत नाही 

अशी एकही गोष्ट नाही आहे..

तिच्या वाचून दूर जाईन अस

कल्पना देखील पाठवणी आठवत आहे..


मला सासरी खुश पाहून तिच्या मनाला खूप 

आनंद आणि समाधान देणारं आहे..

आठवण आली की टचकन पाणी येत

डोळ्या समोर कशी काय ती उभी राहिली आहे..


तिच्या इतक कणखर बनता आल

तर माझ्या सारखी ऋणी मीच आहे..

प्रत्येक जन्मी तूच माझी आई हवी

अशी देवाला एकच मागणी आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन