STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational Tragedy

1.7  

Latika Choudhary

Inspirational Tragedy

तुकडे

तुकडे

1 min
13.7K


 मुळे नाजूक तरली

 धुंद वादळे हरली

 मन हे झाले हिरवे

 फांदी अशी डवरली

 घरट्यात परतले पक्षी

वसंत नाचतो जोमात

जागल्या वेली पुन्हा

सरसरला प्राण मरणात

शोधावे काय रोज नाती

जवळी सारे नाचते आहे

माणूस जीवंत दूर सारून

त्याला पुस्तकी वाचते आहे

 जरी नेली वादळाने वाहून फुले

चिवट पणे ती तगली आहेत

अंश सोडूनी आपुला धरणीवरती 

हळुवार अशी बघ जगली आहेत

 लावून बसला डोळे बघ

नभराजा बरस आता 

आस शेतकऱ्याची तू

पुरव मौसम हा जाता

 इवलासा जीव बघा

करते किती कसरत

पिलासाठी बांधते घर

काडी काडी जमवत

नारी म्हणू की सुगरण

जीवन तुझे घरासाठी

सर्वस्वाचा करते त्याग

कुटुंब उभारण्यासाठी

जात माणसाची नसते कुठली

दानवाला सांगेल कोण कसे?

माणुसकीची जात विसरुनी  

लाजे जनावर ,का त्या करतो हसे ?

 गळणारे पान शिकवून जाते

गर्व नको कशाचा मनी कधी

जन्मला तो संपतोच एकदा

भान असावे ,बदलते सुगी

अनुभवासारखा दुसरा गुरु 

कोणी नाही या जगात 

फी न घेता सर्व शिकवतो

भर घालतो तो ज्ञानात. 

प्रियकरानं पाऊस व्हावं

अवनी प्रियेवर बरसावं

तुम्ही आम्ही कवीमनाने

पाहून त्यांना हरखून जावं

 विरहाचे गीत नित गाई वसुंधरा

 तरी का ना फुटे पाझर वरुणा ?

 हिरदास तिच्या गेले तडे आरपार

 कर करुणा तीवर रे सख्यासजना !

 जलसाठवण भुलती

 जनरक्षण हो करण्या

 नभ झाले कसे कोरडे

 नयनाच्या कडा ओल्या


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational