तुझ्यासाठी माझ्यासाठी
तुझ्यासाठी माझ्यासाठी
तुझ्यासाठी माझ्यासाठी
हवा किनारा सुखाचा
शोधलास तू किनारा
आनंददायी फुलण्याचा।। १।।
अंधारात नसे भीती
साथ तुझी असताना
नात्यातला तो गोडवा
तुझ्यासवे दिसताना।।2।।
नयनात झाकलेली
छबी माझी पाहताना
श्रावणात बहरलेला
श्रावणझुला घेताना।।३।।

