ध्यास
ध्यास
1 min
217
पंढरीचा ध्यास | लागला मनाला
वंदन हरीला | निरंतर .......!!
चंद्रभागे तीरी | विठू हा सावळा
कपाळी टिळा | पांडुरंगा……!!
विठ्ठल विठ्ठल | नाम तुझे घेता
दर्शनांची चिंता | विठूराया……!!
आनंदाची वारी | भक्तगण करी
पुडंलिक हरी | पंढरीचा……!!
भेटाया विठूला | जीव आतुरला
स्मरावे विठ्ठला | ध्यानीमनी……!!
पंढरी जाऊन | वाहते तुळशी
विठू चरणासी | पांडुरंगा……!!
पहिली भेट ती | पायरी नामाची
गरुड खांबाची | पंढरीला……!!
गळयात शोभे ती | तुळस मंजिरी
पंढरीच्या दारी | विठूराया……!!
पंढरी नगरी | रिमझिम सरी
भिजला ग हरी | पंढरीचा……!!