STORYMIRROR

Gayatri Sonaje

Tragedy

4  

Gayatri Sonaje

Tragedy

विरह

विरह

1 min
550

वार अंतरीचा आज सोसते आहे

पण त्याला शोधण्याचे टाळते आहे...


घोर लावून गेला काळजात आता

त्याच आठवांना मी जाळते आहे...


भेटण्यास आता येऊ नकोस चाफा

विरहाची रात्र येथे मी काढते आहे...


आजही कितीदा सोसले मी वार

पुन्हा त्या जखमांना पाहते आहे...


येतात सारखे कवितेत तुझे शब्द

त्याच शब्दांना पुन्हा वाचते आहे...


आसवांना करमत नाही कदाचित

म्हणून तुला पुस्तकात शोधते आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy