Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gayatri Sonaje

Others

3  

Gayatri Sonaje

Others

वारकरी

वारकरी

1 min
172


माझा पांडुरंग ॥ विटेवर उभा 

किती भव्य शोभा। चरणासी....॥१॥ 


हरी पांडुरंग ॥ विठ्ठलाचा गजर

मुखी निरंतर। वारकरी........॥२॥ 


तुळस मंजिरी ॥ वाहते चरणी

विठ्ठल हा मनी । सदानंद.....॥३॥ 


जिवलगा माझा ॥ पंढरीचा राया

किती असे माया । भक्तावरी...॥४॥ 


आषाढ कार्तिकी ॥ भक्तजण येती

विठ्ठाला भेटती । वारकरी.....॥५॥ 


माझी मायबाप ॥ विठ्ठल माऊली

तिची ही सावली । लाभलेली....॥६॥


कस्तुरीचा गंध ॥ केशवासी येतो

नित्य बहरतो । दाही दिशा.....॥७॥ 


किती हो वर्णावा ॥ महिमा विठूचा

कैवारी मनाचा । तो श्रीहरी.....॥८॥ 


पांडुरंग हरी ॥ पाहतो भुवरी

पामराच्या दारी । प्रगटला.....॥९॥ 


कृपादृष्टी राहो ॥ साऱ्या जगावर

जोडतो मी कर । विठूराया.....॥१०॥


Rate this content
Log in