बालपण
बालपण
1 min
244
पुन्हा जगू बालपण
फुल अंगणी फुलावे
असे तेच बालपण
पुन्हा पुन्हा उमलावे...
मित्र मैत्रिणी सोबती
खेळ खेळूया अंगणी
पावसाची ही गंमत
छान होती बालपणी...
नसे कुठलीही चिंता
बिनधास्त होतो सारे
हट्टीपणा असे अंगी
तरी तेव्हा होतो हिरे...
खोडी मस्करी गंमत
करण्या होतो पहिले
भोळे भाबडे चेहरे
बालपणी छान फुले...
