STORYMIRROR

Gayatri Sonaje

Others

3  

Gayatri Sonaje

Others

काय चुकलं माझं

काय चुकलं माझं

1 min
275

काय चुकलं माझं

आयुष्य जगतांना

नात्यांचे अतूट धागे

एका सरीत विणतांना...


अबोल या मनाला

खूप बोलायचे होते

सुखाच्या क्षणाला 

जणू शोधायचे होते...


अवती भवती जसे

जखमांचे अत्तर होते

तरी त्या परिस्थितीशी

जुळवून घेत होते...


काय चुकलं माझं

शंका मनातच होती

दोन चार अक्षरांचे 

शब्द सोडून देत होती...


आपलेच हे आयुष्य

आनंदाने जगायचे

सुगंध होऊन सर्वत्र

सहजपणे दरवळाचे...


Rate this content
Log in