STORYMIRROR

Neha Khedkar

Inspirational

4  

Neha Khedkar

Inspirational

तुझ्या सारखी फक्त तू...

तुझ्या सारखी फक्त तू...

1 min
24K

मायेचा पदर तू..

सुखाची चादर तू..

प्रेमळ हळूवार स्पर्श तू..

निश्चिन्त झोपेचा आधार तू..

दुखवलेल मन सवरणारी तू..

मनात पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तू..

वाटेत आलेल्या अडथन्यातून मार्ग दाखवणारी तू....


चुकलेली वाट बरोबर दाखवनारी तू..

न बोलता मनातलं जाणणारी तू...

तुला नकळत दुखावले तरी जवळ घेणारी तूच...

"सगळं छानच होईल.."असा आधार देणारी तू

"माणसाने नेहमी शिकत राहावं " सांगणारी तू

जीवनात नवचैतन्य निर्माण करणारी तू...


स्वप्नांना मूर्तिमंत आकार देणारी तू..

अंधाऱ्या वाटेत प्रकाशमय मार्ग दाखविणारी तू...

आयुष्यात भविष्यातील रंग भरणारी तू...

यशाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असणारी तू..

शब्दात जिचे वर्णन करणं अशक्य असणारी तू...

माझा पहिला गुरु, माझा कल्पतरू ,माझा देवही तू..

जिची महिमा अपरंपार अशी "आई".. फक्त तू 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational