तुझी माझी भेट
तुझी माझी भेट
तुझ्या माझ्या भेटीत
एक रात्र होती
भरोसा तिचा कसा करावा
तिला ही पहाट होण्याची आस होती
मी सहज तुला त्यावेळी
माझ्या बद्दल विचारले
सांग सजना स्वप्ने तू
माझ्या साठी आहे का रंगवले?
तू म्हणालास की,स्वप्न मी
अवाक्या बाहेरचे पाहतं नाही
तुला वाटतय का भिती सोडण्याची? पण
तसे कधीच गं होणार नाही
अलीकडे माझे डोळे
तुझ्या हर गोष्टीने पानावते
अंदाज़ कसा लावशील तू
की मी कोणत्या गोष्टीने सुखावते!
हिशोब असा जगण्याचा
क्षणातच पुसल्या जाते
काळ सुद्धा पालटतो
नियती कधी बदलत जाते
काळाच्या ओघात सख्या
तुझे माझे बंध जुळले
तुला कधी जाणवले का?
की तुझे शब्द मी खुळले
नवनव्या जखमा तरी
ह्रुदयावर होतच राहते
तुझीच वाट असते बघत
डोळ्यात स्वप्न तुझे पाहते
व्यवहाराच्या कसोटीवर
नाते तू जुंम्पू नकोस
ओलावा नात्याचा आपल्या
मातिमधी दाबू नकोस
कधी कधी वाटत तू
एकदिवस बदलून जाशील
पाहिलेले स्वप्न मी
जागेवर ठेऊन जाशील
साशंक होते मन
उगाच मलाही बैचेन करते
तुझ्या माझ्या प्रितित
असच ते झुरत राहते
तुलाच आठवत राहते.

