तु
तु
तुज पाहता मन हे वेडावले
तूझे मधुर स्मित मनी प्रित फुलवे...
भाव नयनातील केव्हा जाणशील तू
बहर प्रितीचा केव्हाआणशील तू...
कुणी तुजसाठी सर्वस्व अर्पिले
मनोगम्य मनेप्सित तुला न उमगले...
हाक अंतरीचीजेव्हा तू न ऐकली
शब्द सुमनांची तेव्हा माळ गुंफिली...
अबोल भावनांना स्वरबद्ध केले
तुझ्या अनभिज्ञतेने काळीज जाळले...
------------------------------------
क्षितीजा....