तु पाऊस पहिल्या प्रितीचा...
तु पाऊस पहिल्या प्रितीचा...
तु पाऊस पहिल्या प्रितीचा,
ओलिचींब भिजलेली मी माती,
दरवळला मृदगंध मंद साथीचा,
बेधुंद उफानली मनाची नाती ...
फुलाला गंध मातीचा ,
भवरे गुणगुण गाती ,
या वळणावरचा वैशाख वणवा ,
नाचरा वाळीव किती ...
विरह नको रातीचा ,
कुस उलटून चांदणे जाती,
पहाट वारा प्रेमाचा ,
गोडवा रोमरोमांत भरती ...
क्षणभर सुहास मोगऱ्याचा,
बेभान धडधडती छाती ,
मनाच्या गाभाऱ्यात ,
तु मंद मंद तेवती ...