मन झुरझुर करं ...
मन झुरझुर करं ...
बळीराजा - आज लई दिवसानं हा योग आला,
माय तु सजली बघ माया,
जिवात जीव आला ...
पाहूनी मनात भरलं शिवार ,
असं लुसलुशीत पातं अन्
पात्यामधुन डोकावणारं तुरं
येता आनंदाची लहर
मन झुरझूर करं ...
कष्टाने तळहाती आले फोडं ,
सांगु कुणाला तरीबी हसते डोरं ,
हिरव्या शिवारी सपान पडे हिरवं,
तु माझ्या न मी तुझ्या नको दूर दूरं,
येता आनंदाची लहर
मन झुरझूर करं ...
डोळ्याचं पाणी डोळ्यांत मुरं,
आनंदाने दाटतोया उर ,
काळ्या धरणीला गवसला सुर,
तु माझी आई मी तुझा नुर ,
येता आनंदाची लहर
मन झुरझूर करं ...