हा निष्पाप मनाचा गुन्हा...
हा निष्पाप मनाचा गुन्हा...
हा निष्पाप मनाचा गुन्हा,
कळला नाही कुणा,
पहरेदार होते हजार,
तरीही पाखरू उडून जाणार...
कधी जुमानल्या याने रिती,
पाडल्या किती पक्क्या भिंती,
डोळ्यांनीच क्षणभर पाहता,
आयुष्याची जाळते पणती ...
नको नको म्हणता पळते,
मन मनाशीच बोलते ,
ऐकत नाही ते कुणाचे,
जेव्हा प्रेमाची सल सलते...
ओंजळीत विसावते ,
चांदण
स्वप्नांचा थवा ,
क्षणभंगुर आयुष्य जरी,
साताजन्मांचा हवा ...
एकदा केला हा गुन्हा,
दुःखाचा डोंगर पुन्हा,
तरीही सुखावत जाते ,
डोळ्यांना फुटलेला पान्हा...
हा निष्पाप मनाचा गुन्हा,
कळला नाही कुणा,
पहरेदार होते हजार,
तरीही पाखरू उडून जाणार...