STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

बोलता बोलता का?...

बोलता बोलता का?...

1 min
7

बोलता बोलता का? ,

तु नेमका तिथे थांबला ,

जिथे मी श्वास रोखुन धरला,

असा का? छळतो मला,

प्रेम आहे तर बोलना ,

तुझ्याविना करमेना मला ...

बोलता बोलता का? ,

तु नेमका तिथे थांबला ,

जिथे मी श्वास रोखुन धरला...

गाव परीचय तुने दिला,

हसुन हसुन अचानक ,

मित्रांने विचारलेल्या प्रश्नावर,

गहिऱ्या खोल कटाक्षाने ,

माझ्याकडे वळला,

मी कोण? तुझी ,

आता तु बोलणार ,

तेवढयात विषय बदलला ...

बोलता बोलता का? ,

तु नेमका तिथे थांबला ,

जिथे मी श्वास रोखुन धरला ...

प्रेमात तुही आहेस अन् मिही ,

पहिले पाऊल मैत्रीचे ,

पुढे कसे गेले ना तुला कळले ,

ना कळले मलाही ,

डोळ्यांनी बोलून झाले सारे,

ओठ ना सरसावले तुझे ना माझेही ,

ही कोणती रूखरूख आहे ,

तुझ्याकडून मला ऐकायचे आहे ,

'तु माझी आहेस अन् मी तुझा ' ,

कंठात जीव आला,

बोलता बोलता का? ,

तु नेमका तिथे थांबला ,

जिथे मी श्वास रोखुन धरला ...

कळते ना तुला ,

काय ? ते मनात माझ्या,

शब्दच नसतात सर्वकाही,

मौनातही लपली ग्वाही ,

तु माझी अन् मी तुझाच राहील ,

प्रेमाला अंतर नाही ,

सोबत माझी तुला,

अन् तुझी मला ...

बोलता बोलता का? ,

तु नेमका तिथे थांबला ,

जिथे मी श्वास रोखुन धरला ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance