थांबशील का माझ्यासाठी
थांबशील का माझ्यासाठी
तुझ्यावर लिहिलेल्या कवितेच्या
बाकी आहेत अजून काही ओळी.
आतासे कुठे होऊ लागली आहे बघ
हवा जरा गार ,वातावरण पावसाळी.
धडपडत पावले टाकलीत हिमतीने
लाभायची आहे अजून जराशी गती.
चार पावसांची भेट आपली नवी नवी
गोष्टी बोलायच्या आहेत अजून किती.
वात्सल्याची साथ झाली वयस्क आताशी
चारावे म्हणतो हाताने प्रेमाचे दोन घास.
फाटके होते सगळेच आजपर्यंत तरीही
गोधडी मायेची आहे अजूनही खासमखास.
छोटेसेच आयुष्य लाभले मला अन तुलाही
तुझ्या सोबतीने घ्यायची आहे झेप मोठी.
आजचा दिवस माझा मागतो उधार तुला
क्षणभर सांग तूही थांबशील का माझ्यासाठी.?