Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

ते माझे अन् मी फक्त त्यांचे ऐकते...

ते माझे अन् मी फक्त त्यांचे ऐकते...

1 min
5


रंगात रंगलेल्या माझ्या स्वप्नांच्या दुनियेत ,

मी मनमोकळा श्वास घेते ,

सय शब्द होतात माझे ,

हितगुज करतात माझ्याशी ,

हरवते मी त्या दुनियेत ,

विसरून हा फाफट पसारा ,

रमते त्यांच्या सहवासात ,

ते माझे अन् मी फक्त त्यांचे ऐकते ...

सोबतीचा छंद असा की ,

दुरावा सहावत नाही ,

हळुवार जखमांना कुरवाळतांना ,

आश्वस्त होते की आता ,

या भळभळणार नाही ,

नाही सांगु शकत ,

किती खोलवर तो घाव होता ,

हसणाऱ्या ओठांनाच ,

हुंदका गिळायचा होता ,

पण आता सावरले ,

सावरले त्या आघातातून ,

बघ मी जगले ,

तुला वाटले नव्हते ना,

पण मी जगले अन् ,

त्या जखमांशी जवळीक साधली ,

माझ्या शब्दांनी म्हणून आता ,

त्या भळभळणार नाही ,

दुखणार नाही दुखावणार नाही ,

रंगात रंगलेल्या माझ्या स्वप्नांच्या दुनियेत ,

रमते त्यांच्या सहवासात ,

ते माझे अन् मी फक्त त्यांचे ऐकते ...

माझी सावलीही सोबत माझ्या चालते ,

मी जपला रंग माझा वेगळा,

सावळ्या सावलीसवे चालतांना,

ओलावत होती पाठमोरी पण,

आता चाफा दरवळते माझ्या सुगंधाने,

अन् मी रमते माझ्या दुनियेत ,

ते माझे अन् मी फक्त त्यांचे ऐकते ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract