Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

प्रेमाची खुण तुझ्यासाठी...

प्रेमाची खुण तुझ्यासाठी...

1 min
7


अंधार रोखुनी धरला तुझ्यासाठी,

दिवसांची दृष्ठ नको लागायला ,

गाठी चांदण्यांच्या बांधील पदराला,

माझ्या प्रेमाची खुण तुझ्यासाठी...

मुठीत धरीला चंद्र तुझ्यासाठी,

शोभा आली माझ्या ओंजळीला ,

कोंदण दिले मनाचे अंगठीला,

बोटात प्रेमाची खुण तुझ्यासाठी...

आकाशी उंच झोका तुझ्यासाठी ,

क्षितीजावरी नाव आपले कोरायला,

पंख सोबतीने लागले उडायला ,

अंतरंगी प्रेमाची खुण तुझ्यासाठी...

भास माझे ठेवले तुझ्यासाठी ,

स्पर्श वाऱ्याचा लागे मोहरायला,

सुगंध मोगऱ्याचा तुझ्या आठवाला ,

रोमरोमांत प्रेमाची खुण तुझ्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract