नियती...
नियती...
कुणाला ना कळली ,
कशी ही घडली ,
नशीबाची दोरी ,
जिच्या हाती ,
ती नियती ...
फसवे भासते दिनरात,
दगा कुठल्या मार्गात ,
लपुन उघडे टाकते ,
घोर जीवास लावते ...
नशीबाची दोरी ,
जिच्या हाती ,
ती नियती ...
राजा कधी रंक,
तर रंक होतो राजा ,
कोणते फासे पडणार,
ना चाहूल ना वाजा ...
नशीबाची दोरी ,
जिच्या हाती ,
ती नियती ...
दडल्या पावलांची ,
निपचीत पडलेली,
समजु नका अशी,
कर्म सर्वांची बोलली ...
नशीबाची दोरी ,
जिच्या हाती ,
ती नियती ...
केला तिनेच सांभाळ,
दाखवली दिशा ,
प्रामाणिक प्रयत्नांना ,
जगण्याची आशा ...
नशीबाची दोरी ,
जिच्या हाती ,
ती नियती ...
