Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

परत दे मला, माझी तीच वेळ...

परत दे मला, माझी तीच वेळ...

1 min
7


परत दे मला ,

माझी तीच वेळ ,

जी सुखाच्या पदराला बांधली होती ,

तुझा सहवास ,

हेच सर्वस्व ,

गाठ मनाशी पडली होती ...

परत दे मला ,

माझी तीच वेळ ...

मनाला पंख फुटले,

रोज धावते त्याच दिशेने,

जिथे तु मला भेटली होती,

नकळत स्वप्नाच्या ,

धाग्यात गुंफून ,

नाती मनाची जुळली होती...

परत दे मला ,

माझी तीच वेळ ...

निळ्या रंगाची गोष्ट,

रंग सांडता आकाशी,

गुलाबीशी रंगली होती ,

कसा जाऊ परत त्या वेळेत,

जिथे वेळ माझी ,

तुझ्या वेळेशी जुळली होती...

परत दे मला ,

माझी तीच वेळ ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract