आसमंत सजला ...
आसमंत सजला ...
सडा मोगऱ्यांचा ,
जो खाली सांडला,
पहाटेच्या मिठीत ,
लाजुन गंधाळला ...
रात्र ओसरतांना,
स्पर्श मनाला झाला,
तुझ्या सवे सख्या,
जीवनाला अर्थ आला...
चंद्र खिडकी मध्ये ,
कवडस्यांना म्हणाला,
आज नका थांबु इथे,
बहर मिलनाला आला...
वाराही मंदावतांना,
थांबुन थांबुन वाहला,
प्रितीची रात रंगुन ,
रंगात आसमंत सजला ...