पाऊल पाऊल चालना
पाऊल पाऊल चालना
माझ्या सवे सख्या ,
पाऊल पाऊल चालना ,
स्पर्शून मनास माझ्या ,
चाहूल चाहूल देना ...
वेडावितो भास तुझा ,
मन माझे ऐकेना ,
कशी सावरू स्वतःला ,
कानात माझ्या बोलना ...
शब्द माझे कविता तुझी ,
छंद हा तुला कळेना ,
मी लिहिते तुला ,
तू मला वाचना ...
सावल्यांचा पाठलाग करता ,
दिशा कोणती कळेना ,
हरवली स्वप्न व्युहात,
बाहेर तू ओढना ...
चिंब चिंब भिजायचे मला ,
बरसात प्रेमाची करना ,
चालू सप्तपदी सवे ,
पाऊल पाऊल चालना ...