Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

झाडे बोलली...

झाडे बोलली...

1 min
5


उन्हाने जेव्हा जीवाची लाही लाही झाली,

आडोसा घेण्यासाठी सावली शोधली ,

दूर दूर वाटेवरूनी नजर फिरली ,

इवलीशी दोन चार पाते हलतांना दिसली...

आशेचा सुस्कारा सोडत पावले चालली,

म्हणायला झाड पण फारच कमकुवत दिसली,

मनात म्हटलं इथे कशी मिळेल सावली ,

दोन चार फांदयावर चारच पाने लागली ...

तेवढयात हळूच रडक्या स्वरात हाक आली ,

असे नव्हते मी , ही जी दशा माझी झाली ,

मी भांबावून इकडे तिकडे शोधाशोध केली,

पुन्हा मी झाड बोलतोय केवीलवाणी पाने हसली...

आता मात्र मला खरचं किव आली ,

रहावले नाही मला म्हणून प्रश्नावली ,

काय? झाले हिरवळ अशी का? लुप्त झाली ,

बोलणारी झाडे आज पहिल्यांदा पाहली...

पुन्हा झाडाची पाने वाऱ्यांवर डोलली ,

वृक्षतोड मानवाने केली पृथ्वी जळली ,

शोधून सापडणार नाही गारव्याला सावली,

माझीही फांदी फांदी मातीत मिसळायला लागली ...

खरचं हा अंत माझा का? ,ही गोष्ट ना कळली ,

मी नाही तर जीवसृष्टी कशी तरली ,

अजुनही वेळ मानवा नाही टळली ,

ओळखून काळाची गरज वाढवं वृक्षवल्ली ...

उन्हाने अंगाची होणारी लाही शमली,

लाखमोलाची बात आज झाडाने केली,

आताही वाट बघणार की नुसतीच कविता वाचली,

कळू द्या मला,

तो दिवस यायच्या पहिले सृष्टी हिरवीगार झाली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract