का? अंत तिचा झाला...
का? अंत तिचा झाला...
उधाणलेला सागर आतुर,
नदी येईल भेटीला ,
ओढ दोघांच्या मनात ,
तीच्या अडथळे वळणाला...
गाज सागराची आर्त,
नदी घायाळ क्षणाक्षणाला,
परी तीची दुविधा ही,
नाही समजे कुणाला...
दुःख अनावर सागराचे,
का? दगा दिला मला,
अजुनही नदी मात्र,
वाहते वळणावळणाला...
ओहोटी लागली सागराला ,
नदीच्या दुःखात हरवला ,
नदी मात्र आनंदात ,
शेवटी भेटेल सागराला...
वळुन सागर तिला बोलला ,
का ? ऐवढा उशीर लावला,
झुळझूळ वाहत नदी ,
तो तिच्या मिठीत शिरला...
कधी हरवली नदी ,
एकरूप झाली सागराला,
अस्तित्व कुठे तिचे,
भेटता सागर का? अंत तिचा झाला...

