Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Abstract

3  

BABAJI HULE

Abstract

तत्ववेत्त्यांचा देश – हिंदुस्थान

तत्ववेत्त्यांचा देश – हिंदुस्थान

5 mins
160


सध्या देश एका विचित्र अवस्थेतून जात आहे, जनता सैरभैर झाली आहे. एक वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाच्या विषाणूने जगाला विळखा घालता- घालता भारतालाही आपल्या कवेत सामावून घेतले आहे. नोव्हेबर – डिसेंबर २०२० मध्ये परिस्थिती सामान्य होत असताना फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये कोरोनाने आपले रौद्र रूप धरण केले आणि मधल्या काळात विसावा घेत असलेल्या काही राज्य सरकारांना जाग आली परंतु केंद्र सरकार मात्र निद्रा अवस्थेतच राहिले. जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात जनतेची प्रार्थमिकता काय असायला हवी हे पूर्वीही कधी समजले नाही आणि आजही ते दुय्यम स्थानावरच असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शेकडो पक्षाचा गलबला असलेला हा आपला देश, जनहित बाजूला ठेवून आपली उद्धिष्ट काय वेगळीच आहेत, आपली विचारधारा भिन्न आहे हे जनतेच्या मनावर बिंबवत राहिला आणि वेडी जनता त्यापाठीमागे फरफरटत राहिली. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील आरोग्य व्यवस्थेची उभारणी, हॉस्पिटल्स आणि त्यासाठी लागणारी सरकारी यंत्रणा आजही तशीच आहे. खाजगी व्यवस्थेत बऱ्यापैकी बदल दिसून आला परंतु आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या आपल्या देशात त्यावेळची ७० ते ८० कोटी लोकसंख्या असतानाच्या सुविधा आणि आताची १३८ कोटी लोकसंख्येला त्याच यंत्रणेचा सामना करावा लागतो आहे हे विसरून चालणार नाही आणि हीच खरी या देशाची शोकांतिका आहे.


   सत्ता कोणाची असू द्यात, पक्ष कोणताही असू द्यात, राजा कोणताही असू द्यात. सामान्य जनतेच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही हे पुन्हा पुन्हा देशाने पहिले आहे. ज्या देशात कोरोन सारख्या महामारीने थैमान घातलेले असताना प्राणवायू ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे जनता मृत्युमुखी पडत आहे, देशात मृत्यूचे तांडव सुरु आहे, संपूर्ण देशाची आरोग्यव्यवस्था पूर्णता कोलमडली आहे. गेल्या १० ते १५ दिवसात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने रुग्ण संख्येने धोक्याची पातळी ओलांडली आहे, आणि आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहे .प्रत्येक राज्यात याचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात आहे परंतु परिस्थिती हाथाबाहेर गेली आहे. हि वेळ अशी आहे कि या परिस्थितीला कोणाला जबाबदार धरायचे, किवा कोणाकडे बोट दाखवायची हा एक विक्षित प्रश्न निर्माण झाला आहे. जनता कि राज्यकर्ते ? खरे उत्तर आहे ते म्हणजे आपण स्वत: जनता ----- कोरोनाचे खरे वाहक तर आपणच आहोत, राज्यकर्ते तर एक कळसूत्री बाहुली आहे. हे हि आपणाला विसरता येणार नाही. गेल्या वर्षी मी “कोरोना आणि त्यावरची उपाययोजना” हा एक लेख लिहिला होत कारण त्यावेळी परिस्तिथी वेगळी होती आणि आता वेगळी आहे. एक वर्षापासून आर्थिक विवचनेत सापडलेला देश कसा तरी बाहेर निघण्यासाठी धडपडत असताना या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा आपल्याला घायाळ करून टाकले आहे. 


   दारिद्र्य रेषेखाली आणि गरीबाच्या यादीत उच्च स्थानावर असणारा आपला देश, अंधश्रद्धेची पाठीराखण करणारा आपला देश, जनतेच्या जीवाची मोल नसलेला आपला देश, अत्यल्प आरोग्यव्यवस्था असलेला आपला देश, पायाभूत सुविधाची अपेक्षा ठेवणारा आपला देश -- जागतिक महागुरुची होण्याची स्वप्ने पहात होता ती कोणत्या आधारावर या प्रश्नाचे उत्तर सापडणे तसे कठीण आहे परंतु ते चुकीचेही नाही हे हि तितकेच खरे, आणि का पाहू नये ? परंतु नीतीहीन राजकारण, स्वार्थासह खुर्चीची चटक, अहंमपणा आणि काही तांत्रिक गोष्टीचा सर्रास वापर करणारे राज्यकर्ते यांच्या टोळ-भैरवीत अडकलेले शासनकर्ते दिशाहीन वाटचाल करताना दिसत आहेत. का झाले आहे असे याचे एकमेव कारण म्हणजे अंधभक्ती, अशिक्षितपणा आणि दृष्टीहीन जनता --- बाकी कोणीही नाही. जे राज्यकर्ते सुशिक्षित तरुणांना नोकरी देवू शकत नाही, किवा त्याचा आपल्या पक्ष वाढीसाठी वापर करतात त्यांना त्याचा दोष देवून काय फायदा? दोष तर जनतेचा आहे आपल्याला काय हवे तेच जर आम्हाला कळत नाही तर असे होणारच --- मंदिरे, पुतळे, समाधीस्थळ, जात-पात या विषयावर मत मागताना राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही परंतु तीच मते देताना आपली तरी बुद्धी कुठे शाबूत आहे हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनाला भेडसावल्या शिवाय राहणार नाही. पारदर्शकता हे नाव तर काढायलाच नको कारण जेव्हा सत्तेचे रक्षकच जनतेचे भक्षक बनतात तेव्हा कुंपणानेच शेत खाले म्हणण्यात काय अर्थ आहे ?


     अजूनही वेळ गेलेली नाही परंतु उशीर नक्की झालाय, ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे नव्हे तर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे गेल्यात त्यांना जावून विचारा कि नक्की त्या वेळची परिस्थिती कशी असते. हे काय नैसर्गिक संकट नाही किवा त्याची चाहूल आपल्याला नव्हती. गेल्या वर्षी चार महिने घरात राहून आपण बाहेरील देशाची अवस्था टीव्हीवर रोज पाहत होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाका ही आपण पाश्चिमात्य देशात पहिला, मग आपण यातून काय शिकलो, आपण काय तयारी केली---- ती फक्त शून्य. ! 


   एक मेंदूला विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे, जनता म्हणून आपली जबाबदारी काय ? आणि आपणच निवडलेले आपले राज्यकर्ते म्हणून त्याची जबाबदारी काय ? याचा कोठेही ताळमेळ तुम्हाला दिसणार नाही, कोणत्या आधारावर आपण सर्वाच्या बरोबरीन एकमेकाच्या विश्वासावर आदर्श भारत, रामराज्य आणि महागुरू यासारख्या भाकट कल्पना करत आहोत ? कोणता मार्ग आपण पत्करला आहे कि जेणेकरून वरीलपैकी एक तरी गोष्ट आपण निश्चितपणे साध्य करू शकतो ? आज जगात आपण, अन्नधान्य, शेती, ओषधे, रासायनिक खते अशा विविध बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. मग याच बाबतीत देशाचे वाभाडे गेल्या एक वर्षात का निघाले ? गोरगरीब अन्नावाचून रस्त्यारस्त्यावर मारतायेत, नोकरदार वर्ग बेकार होताना दिसतोय, अर्थव्यवस्था उणे चिन्हाच्या खाली गेलीय, सामान्य जनता कोरोनाच्या महामारीत प्राण वायूसाठी तडफडतेय, आणि रंगील राज्यकर्ते खुर्चीच्या राजकारणात व्यस्त आहेत. अंत्यसंस्करासाठी टोकन नबर दिले जातायेत, एवढेच काय ते उत्तरप्रदेशात रस्त्याच्या कडेलाच सरण रचून अग्निडाग दिला जातोय, किती हि भयानकता, विषमता, आणि मानवी हक्काची पायमल्ली, मनुष्य जीवनाचे मोल शून्य ------


जनता किड्यामुंग्यांप्रमाणे मारली जातेय हेच आहे ते विदारक सत्य. मग काही तत्ववेत्ते आणि स्वंय घोषित शास्रज्ञ जनतेला सांगण्याचा नव्हे तर समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात, अमेरिका, युरोप, सौदिअरेबिया आणि पाशिमात्य देश याची मिळून लोकसंख्या १३६ कोटी आहे आणि त्याच्याकडे आणि त्याच्या मृत्यूचे आकडे आणि भारतासारख्या १३८ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशातील मृत्यूचे आकडे किती मोठी तफावत आहे, ते किती विकसित देश आहेत आणि आपण किती अविकसित, अरे कसली तुलना करतायेत ? मग तुम्हाला हे सांगायचे आहे का आपण मृत्युमध्ये फार पाठीमागे आहोत आणि अजून आपल्याला बरीच काही शिखर गाठायची आहेत किवा आमची व्यवस्था कितीतरी पटीने चांगली आहे हे दाखवायचा प्रयत्न --- अरे तुम्ही लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून जीवाचे मोल ठरवणार काय ? आणि मग तुलनाच करायची असेल तर शेजारील चीन बरोबर करा आपल्या पेक्षा जास्त म्हणजे १५२ कोटी लोकसंख्या असलेला देश फक्त काही हजारा मध्ये मृत्यू थांबवतो आणि आपण ? ---- नेहमी तुलना बरोबरीच्या लोकाशी करावी, ना मोठ्याशी ना छोट्याशी, तेव्हा त्याचा अर्थ समजतो, कळतो आणि समोरच्याला समजावू शकतो. नाहीतर हा एक वास्तवापासून दूर जाण्याचा पळपुटेपणा म्हणा किवा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न म्हणा. 


   अंतिम सत्य एकच आहे, रामाच्या नावावर अंधभक्ती करून, मंदिरे किवा मस्जिद बांधून, रामराज्य येणार नाही. मुळात ज्या संज्ञेवर आपण रामराज्याची व्याख्या ठरवितो ती एक कल्पनाच चुकीची आहे. जेथे राजाच दिशाहीन असतो तो जनतेला काय मार्ग दाखवणार ? मुह मे राम बगल में छुरी --- नाही कधीच हे हिंदुस्थानसाठी हितावह नाही. 


     गरज आहे ती एका हिंदू राष्ट्राची नाही तर ईश्वरीय राज्य आणण्याची जेथे समानता असेल, जेथे आर्थिक विषमता नसेल, जेथे आरोग्य व्यवस्था सुदृढ असेल, जनतेत एकमेकावर विश्वास असेल, जेथे राज्यकर्त्याचा सन्मान असेल. गरज आहे संपुर्ण समाज व्यवस्था बदलण्याची, खरे आदर्श लोकतंत्र निर्माण करण्याची, प्रार्थमिक गरजा पूर्ण करणाऱ्या नेत्याची निवड करण्याची, कारभारात पारदर्शक असणाऱ्याची, आणि पूर्ण भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे म्हणण्याची आणि तोच विश्वास सार्थ ठरविण्याची .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract