# ट्रीप
# ट्रीप
बागेमधला फेरफटका
करतो आनंदी म्हणाला.
निवांत झाडाखाली बसुनी
अनुभवा शांततेला.
घरापासून थोडे बाजूला
मोकळा श्वास घ्यायला
देते आनंद छोटीसी ट्रीपही.
झाडांच्या थंडगार सावलीने
थंड होते मनही.
रंगीबेरंगी फुलांबरोबर
नाचावे वाटते.
लहानग्यासवे झुल्यावर
मन झुलावयास जाते.
गर्द हिरवळ पायांना
गुदगुल्या करते.
चालताना शरीराचा
थकवा घालवते.
पक्षी मंजुळ गाणी गाती
भिरभिर फिरती फांद्यांवरती.
बघत रहावे त्यांचे फिरणे
फिटते डोळ्यांचे पारणे.
छोटीशी ही सहल
मनाला देते उत्साह.
नव्या जोमाने काम
करण्यासाठी होतो तैयार.
