ठेच
ठेच
ठेच लागली पायला
मलम पट्टी करता येईल,
पण मनाला लागलेली ठेच
सांगा बर कशी बरी होईल
लागलेली जखम होते बरी
काळानुसार घावही भरतात,
पण मनावर झालेले घाव मात्र
कायमस्वरूपी मनावर कोरतात
ठेच कधी कुणाच्या मनाला
लागू नये असे वर्तन असावे,
आपल्या वागण्या बोलण्यातून
सदैव इतरांप्रती आदराभाव जपावे