STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

3  

Monali Kirane

Inspirational

टॅग

टॅग

1 min
271

माणसाच्या स्वभावातच आहे लावणे पट्कन टॅग,

जन्मल्यावर लगेचच नी मेल्यानंतरही लागतो नावाचा टॅग!

भिडस्तपणाला-तुसडेपणाचा, अबोल मनाला-शिष्टपणाचा उगीचच लागतो टॅग!

भारंभार नोटांवरून प्रतिष्ठेचा,पांढऱया कपड्यात बॅनर लागलं की कार्यकत्याचा टॅग,

मोफत मदत म्हटलं की समाजसेवकाचा टॅग!

टॅग नसेल तर स्कॅन कसे करणार?

रटाळ आयुष्यात स्कॅम कसे भरणार?

सृष्टीच्या सृजनाला कुठल्यातरी नकारात्मकतेचा नका लावू उगीच टॅग! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational