तरुणपण
तरुणपण
सर्व आयुष्यामध्ये , छान असते बालपण
बालपण जाऊंनी , येते मग तरुणपण
सुरु होतो जसा , जीवनाचा प्रवास
थोडे थोडे उमगते ,जीवनाचे भास आभास
तरुणपण येता , विचारही वाढते
अल्लड आयुष्य मग ,जरा सावध होते
जबाबदारी नसते , एवढीपण मोठी
स्वप्नं असतातं फक्त , आपल्याच साठी
तरुणपण एक पाऊल , जेंव्हा पुढे चालून जाते
सोडून सर्व काही मागे ,फक्त जबाबदारी उरते
वेळ मग नसतो , निवांत जगण्याचा
तेव्हा अर्थ कळतो , खरा तो आयुष्याचा
