STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Inspirational

4  

Sumit Sandeep Bari

Inspirational

तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान.

तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान.

1 min
396

जिथे सर्व धर्म, जात एक समान,

जिथे सर्व धर्म, जातीला स्थान,

अश्या देशाचे गातो मी गुणगान,

तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान. 


जिथे स्वातंत्र्यासाठी लढले व्यक्ती महान,

जिथे नाही कोणी मोठा कोणी लहान,

अश्या देशाचे गातो मी गुणगान,

तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान. 


ज्याने जागतिक संघटनेत मिळवले स्थान,

ज्याचा सर्व जगात होत आहे सन्मान,

अश्या देशाचे गातो मी गुणगान,

तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान. 


ज्याचे सर्वात पहिले यशस्वी झाले मंगळयान,

ज्याला मिळत आहे संपूर्ण जगात मान,

अश्या देशाचे गातो मी गुणगान,

तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान. 


जिथे होऊन गेले थोर जसे अब्दुल कलाम,

अश्या देशाला करतो मी प्रणाम,

अश्या देशाचे गातो मी गुणगान,

तो देश म्हणजे माझा हिंदुस्तान.



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational