तो आणि ती
तो आणि ती


तो..... एक क्षणही तुला मागे
वळून बघावेसे वाटले नाही का गं?
ती..... बऱ्याचदा वाटले पण मीही तुझ्या हाकेची वाट पाहत बसले
तो.... अंतर वाढवली तू दोघात परके केले मला क्षणात
ती..... शब्दाचे खेळ खेळू नको तू खऱ्या प्रेमाला शब्दरुपी अलंकाराची जोडणी नको देऊ
तो..... इतका परका झालो मी सांग यात माझी काय खोडी
ती... तुझी कसली खोडी मीच चुकली थोडी
तो... तुझ्याशिवाय तर सर्व व्यर्थ, उरला नाही जीवनाला अर्थ,
ती... हे तर जीवन तूच निवडलं, प्रॅक्टिकल होऊन भावनांना खोटं ठरवलं
तो... मी नाही राहिलो तसा बदललोय आता,
ती... कधीच नाही बदलणार, माझ्यासाठी प्रत्येक क्षणात आयुष्य, तू मात्र वेळेचाही हिशोब ठेवणार,
तो... तू गेली जीवनात शांतता पसरली, नको वाटतं सर्व व्यर्थ असल्यासारखे
ती... नुकसान तर माझे झाले, देवाच्या जागी तुला पुजले,
तो... सोड हा अबोला आता प्रश्न सुटले,
तुझे म्हणणे मला पटले,
ती... कधीच उलगडणार नाही हे कोडे मी बहरलेली सदाफुली, तू मात्र अबोल कळी,
तो.... तू मला माफ करावं आपण पुन्हा नातं फुलवावं
ती.... माझ्या स्वप्नाचा बळी देऊन तुझे स्वप्न सजवतोय,
आजही बघ तू किती स्वार्थी होतोय
आजही बघ तू किती स्वार्थी होतोय