तिरंगा
तिरंगा
केसराच्या वैभवावर
प्रकाशला शुक्रतारा
पुलकित जाहली यामिनी
मिटला अंधार सारा
श्रवणीय गीत मातृभूमिचे
आले ओठावर गाणे
गुंजू लागले दिशांतून
अभंग एकतेचे तराने
डौलात फडकला तिरंगा
जाहले देशप्रेम दिवाने
देशभक्तीच्या रंगाने
रंगले मनातले कोणे
