Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Udgirkar

Romance

2.4  

Sanjay Udgirkar

Romance

तिला कसे सांगावे

तिला कसे सांगावे

1 min
192


तिला कसे सांगावे

तिला कसे कळवावे

ती मला आवडते त्याचे काय करावे

वाटते तिलाच पहात रहावे

तिने बोलत रहावे

मी समोर बसून ऐकत रहावे


तिला कसे सांगावे

मनात उमललेले फूल तिला कसे दाखवावे

उरलेले आयुष्य आता तिच्या बरोबरच घालवावे

तिचे दुःख तिच्याकडून कसे मागून घ्यावे

माझ्या कडील सर्व सुख तिच्या बरोबर वाटावे

अश्या विचारातच माझे मन सदा रमावे


तिला कसे सांगावे

आपले मन तिला उकलून कसे दाखवावे

त्यात तिला तिचे प्रतिबिंब दिसावे

असे काही तरी व्हावे

माझे तिच्यावरचे प्रेम तिला मी न सांगता कळावे

मी तिच्यात अन तिने माझ्यात विरघळावे


तिला कसे सांगावे

प्रेमाचे वावटळ उठावे

आम्ही त्यात अजाणता अडकावे

मधेच वीजेने कडकडावे

तिने भिऊन माझ्या हाताला घट्ट धरावे

पावसाच्या सरीने आम्हाला धोपटावे


तिला कसे सांगावे

तिने नाही म्हटले तर काय करावे

आता जे एकतर्फी आहे तेही लागेल सोडावे

का तिला न विचारता असेच एकतर्फा प्रेमाच्या भ्रमात रहावे

तिच्यासाठी तिला नकळत झुरावे

तिच्या आठवणीत आयुष्य एकाकी घालवावे

तिला कसे सांगावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance