STORYMIRROR

Sanket Potphode

Inspirational

4.6  

Sanket Potphode

Inspirational

ती

ती

1 min
822


अशाच एका क्षणी निवांत बसलेलो असताना

ती धावत येऊन कवेत घेऊ पहाते

मी ही मग वेडा तिला कवटाळू बघतो

तेव्हा ती आल्यासारखीच अचानक निघून जाते


अशाच एका क्षणी कामाशी झुंजत असताना

ती लाडात येऊन माझ्याशी खेळू पहाते

मी ही मग वेडा म्हणतो मरू दे ती लगीनघाई

तेव्हा ती डावच अर्ध्यावर सोडून जाते


अशाच एका क्षणी एकटा बसलेलो असताना

ती आपुलकीने साथ द्यायला म्हणून येते

मी ही मग वेडा झटकून टाकतो एकांताला

तेव्हा ती एकट्या रात्रींत डोळ्यात तेल टाकून जाते


अशाच एका क्षणी मी तिच्या मागावर निघतो

ती ही मग मान ठेऊन पापण्या जड करते

मी ही मग वेडा तिच्या कुशीत विसावायला बघतो

तेव्हा ती 'झोप' मात्र केव्हाच उडून गेलेली असते


तेव्हा ती 'झोप' मात्र केव्हाच उडून गेलेली असते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational