ती
ती
चूल आणि मूल तिने कधीच सोडले नाहीत
समाजाने घातलेले नियम कधीच तोडले नाहीत
संस्कृती आणि परंपराचा नेहमी केला तिने आदर
उत्सव आणि समारंभातही उल्हासाने असे ती सादर
ढळू दिला नाही कधी तिने सार्या मर्यादांचा पदर
तिच्या वाट्याला मात्र नाही घडला कधीच आदर
परिस्थितीला तोंड देताना डगमगली नाही ती कधी
कठीण प्रसंगात झाली ती झाशीची राणी आधी
दुखावली जरीही ती नाही दुखावले तीने कुनाला
मर्यादांना सांभाळत नेहमी समजावले तीने मनाला
ओळखून सामर्थ्य स्वतःचे उभारले विश्व तीने
जोडले प्रेमाने जग अन जिंकली सारी मने
आता कुठे पडली बाहेर अलगद तिच्या कोशातून
घेतली भरारी तीने मनगटातील जोशातून
नका थोपवू तिच्या भावना ती तर आहे सुप्रिया
मनिषा तुमची करेल पूर्ण ती तर आहे ऐश्वर्या
स्वागत करा विचारांचे तिच्या आहे आजची ती नारी
गुढी उभारावी तिच्या प्रेमाची नांदाल सुखाने सारी
