STORYMIRROR

Swarup Sawant

Inspirational

4  

Swarup Sawant

Inspirational

ती भेटते तेव्हा

ती भेटते तेव्हा

1 min
665


ती भेटते मज तेव्हा

उठे अंगी हो रोमांस

आभाळ ठेंगणे मज

शब्दांचा खेळ खास॥१॥


रोकण्या तिज चाले

मनीचा नित् ध्यास

वासनेस नसे थारा

माझीच होती खास॥२॥


दुरावा न होई सह्य

तळमळे हा श्वास

अंतरीच्या भावनांना

तरल असे आभास॥३॥


अबोल प्रितीस माझ्या

नयनांची हो आरास

नाना परि मी करितो

काव्याचा परिहास॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational