STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Fantasy Inspirational

3  

Rohit Khamkar

Classics Fantasy Inspirational

थोडंसं कौतुक मिळवायचं

थोडंसं कौतुक मिळवायचं

1 min
133

पुन्हा नव्याने प्रयत्न माझा, चांगल काही लिहायचं

ज्यास्त काही नाही, थोडंसं कौतुक मिळवायचं

यात थोडं हसायला येत, पण धडपडीन वागायचं

हळू हळू शब्द मांडू, जे काय ते लिहायचं

नंतर वाचू साऱ्या समोर, होईल काय ते पाहायचं

ज्यास्त काही नाही, थोडंसं कौतुक मिळवायचं

ऐकून येतील अभिप्राय चार, त्यांनाही मग भेटायचं

प्रत्येकाचे वेगळे विचार, बसून ऐकटा ऐकायच

थोडासा विचार सुधारून, हसून थोडं नाचायचं

ज्यास्त काही नाही, थोडंसं कौतुक मिळवायचं

यातच आला प्रसंग केव्हा, दिग्गजाना भेटायचं

सहवास थोडासा त्यांचा, आणी खूप काही शिकायचं

हा थोडं फार माझही ला साहित्य, त्यांनाही ऐकवायचं

ज्यास्त काही नाही, थोडंसं कौतुक मिळवायचं

सगळं झालं असं शांत, की हसून काही सुचायचं

मग अलगद मांडणी प्रयत्न, त्याला कागदावर उतरवायचं

आज सारं स्वप्न मांडलं, जे थोडंसं का होईना मिरवायचं

ज्यास्त काही नाही, थोडंसं कौतुक मिळवायचं

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics