थैमान भीतीचे
थैमान भीतीचे
झाला रस्ता मोकळा
शुकशुकाट पसरला,
भीतीच्या थैमानाने
माणूसपणच हरवला..!!१!!
रोज हृदय जळते
शवपेट्या त्या पाहून,
रांगाच रांगा लागलेल्या
मोक्षप्राप्ती करण्यास घेऊन..!!२!!
आयुष्यभर ज्यांच्याबरोबर
रडलो, हसलो, रमलो,
शेवटच्या क्षणात बघा
जवळ कोणास ना ठेवीलो..!!३!!
असा कसा काळ आला
माणूसच माणसाला विटाळला,
भक्ताची हाक ऐकून आता
देवही देव्हाऱ्यात गडबडला..!!४!!
दिवस आले वाईट आता
पैशा पाण्याचा झाला तोटा,
शिक्षण तर राहिलेच बाजूला
समाजच भासे आज खोटा..!!५!!
अश्रूंचा ओघळ आज
करे विनवणी कोरोनास,
नको दाखवू दृश्य हे
दुःखीकष्टी माझ्या मनास..!!६!!
