STORYMIRROR

Vimal Patkari

Abstract Tragedy Inspirational

3  

Vimal Patkari

Abstract Tragedy Inspirational

थांबवा ही भ्रूण हत्त्या !!

थांबवा ही भ्रूण हत्त्या !!

1 min
201

अहो,कुणीतरी सांगाल का ?

स्री सबला असूनही 

स्री भ्रूण हत्त्या करतात का ?

तिला इतकं घाबरतात

इतकं कमी लेखतात

की,ती येण्याची चाहूल लागताच तिला हद्दपार का करतात ?


स्वत:ही होणार असतात पिता

मग का पेटवताय भ्रूण हत्तेची चिता ?

ममतेच्या हृदयी लादून नैराश्यता

पिचवताय का वात्सल्यमयी अंतरा ?

लावून पुरुषांच्या खांद्यांला खांदा


स्री ही ओढतेच ना संसाराचा गाडा 

तरीही का होत नाही स्री-पुरुष समानता?

अन का थांबत नाहीत स्री भ्रूण हत्त्या ?

आज नाही कुठंही कमी स्री या जगात

स्वकर्तृत्वानं चकाकतेय ती सार्याच क्षेत्रात 

अशी ही स्रीची महती सारेच जाणतात

तरी ही वेड पांघरूण पेडगावी का जातात ?


स्री पोटीच जन्म घेवून 

तिच्या मायेच्या संगोपनीच वाढून 

अन तिचीच अवहेलना करुन

वावरताय का कृतघ्न होवून ?


हं.आलं,आलय ध्यानी

मुलगी ही परक्याचं धन समजून 

बलात्कार,हुंडाबळी अन काही सामाजीक रुढी

या आणि अशा अनेक कारणांचा विचार करुन 

मुलीच्या दृष्टीने या सार्या कटकटीच समजून


भ्याडपणे तिला का देताय घालवून ?

पण या सार्या कारणांत तिचा काय दोष ?

धरु नका तिच्यावर रोष

तुम्हीच नष्ट करा

सार्या अन्यायांचे कोष

अन येवू द्या तिला

दोन कुळांचा करण्या जयघोष 

दोन कुळांचा करण्या जयघोष !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract