STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

3  

Meenakshi Kilawat

Tragedy

तांडव पुराचे

तांडव पुराचे

1 min
29K


पुराचे तांडव । हाल मनुष्याचे

आले केरळचे । अचानक ।।१।।


कोपला निसर्ग । सत्यानाश केला

संसार बुडाला । पाण्याखाली।।२।।


संकटे संसारी । गेले आडेफाटे

उद्वस्थ या वाटे । पुरापाई ।।३।।


निरपराधांना । लागले ग्रहण

देखत मरण । ओढवले ।।४।।


इमले स्वप्नांचे । उरी कोसळले

जीवन उरले । रडायला ।।५।।


अपार आपत्ती । दु:खाचा संसार

पोहोचली झार । अतोनात ।।६।।


नैसर्गिक घाला । अश्रृ ही डोळ्यात

देवु यारे मात । मदतीने ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy