तांडव पहापुराचे
तांडव पहापुराचे
तांडव येता महापुराचे
निद्रस्त असे जनता
आंकात ह्या जिवाचा
रुद्ररूप तिने घेता
येता तांडव महापुराचे
बेघर केले सारे
तांडव त्याचे पाहून
अंगा भरे कापरे
केरळात चाले तांडव
महापुरात गेली गावं
निष्पाप मेली बालके
पाण्यात बुडाले जीवं
तांडव महापुराचे येता
सर्व केला एकच घास
राहिलो जरी एकटा
नाही उरला श्वास
पहाता तांडव महापुराचे
डोळा पाणी दाटले
नाही माझ्यात राम
पंख माझे छाटले
येता तांडव महापुराचे
झाली सारी बरबादी
मुकले जीवनास सारे
कोण वादी कोण अपराधी ।।