STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

1.5  

Shila Ambhure

Tragedy

तांडव महापुराचे

तांडव महापुराचे

1 min
30.5K



कोपलेला मेघराजा तो

करी तांडव महापुराचे.

हिरावून घेतो सहज

संचित सारे मानवाचे.


निसर्ग हा स्वच्छंदी

ऐकतो ना कधी कुणाचे.

वागतो मनासारखे

करी तांडव महापुराचे.


घाबरले मी पाहुनि

तांडव महापुराचे.

आज समजले मला

रौद्र रूप निसर्गाचे.


रुसला कधी निसर्ग

सावट अवर्षणाचे.

कोपला निसर्ग जर

तांडव महापुराचे.


तांडव महापुराचे

नेती वाहुनिया सारे.

होतसे जिवितहानी

बेघर सजीव सारे.


झाडे-वेली,पशु-पक्षी

झाली सारी मूक वाचे.

नको दाऊ रे निसर्गा

तांडव महापुराचे.


अतिवर्षणात अशा

घडे दर्शन मानवतेचे.

तांडव महापुराचे

मनातुनि मग खचे.


सज्ज हो मानवा तू

पुढे कर हात मदतीचे.

पाहुनि तुझे सामर्थ्य

थांबेल तांडव महापुराचे.


देऊया वाट नद्यांना

बांधुया बांध- बंधारे.

करुया उपाय अनेक

थांबवन्या तांडव महापुराचे.


हात कैक देऊ मदतीचे

जीव वाचवू साथीदारांचे.

घालील मान खाली मग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy