STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

3  

Vijay Sanap

Inspirational

सय माहेराची

सय माहेराची

1 min
30K


सय माहेराची येता

येतं हृदय भरून

काळ्या डोंगराच्या आड

दिसे माहेर दुरून ।।


सय माहेराची येता

मला लागते उचकी

आठवण बंधुराया

भर झोपेत दचकी ।।


बाई मह्या सपनात

सण पंचमीचा येतो

शेता चालता वाटेला

भास मुऱ्हाळ्याचा होतो ।।


कसं साजत माहेर

घरा दाराला झुंबरं

चिरबंदी राजवाडा

त्याला मोत्याची झालरं।।


सय माहेराची येता

नाही मन गं लागतं

माझ्या माहेरा सारखं

नाही सासरं वागतं ।।


सय लाडकीची येता

गोठ्या हंबरते गाय

ओढ लेकीच्या येण्याची

भान हरवते माय ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational