STORYMIRROR

Anita Gujar

Inspirational

3  

Anita Gujar

Inspirational

स्वयंसिद्धा

स्वयंसिद्धा

1 min
894


अनादी काळापासून स्त्रीला मिळतसे दुय्यम स्थान

पदोपदी तिला सहन करावा लागतसे अपमान,


रोज रोज टाकीच घाव खाऊन देवपण येत म्हणतात

स्त्रीचही तसंच असतं रोजची टोचणी अन् अत्याचार सहन करतात,


निराशाने खचून न जाता आत्मविश्वासाने भावना पेटून उठल्या

कशा का होईना पण स्त्रीच्या संवेदना जागृत झाल्या,


अन्यायाविरुद्ध लढा पुकारण्याची ऐतिहासिक परंपरा

अंगात संचारला स्वाभिमान अन् पेटून उठला निखारा,


अबलाची सबला कधी झाली कळलेच नाही

आता मात्र कोणाची बोलायची टाप नाही,


स्वतःच्या गुणांच्या प्रखर तेजाने

उजळविल्या दाहिदिशा

परी संसारात मात्र गिरवला कर्तव्यदक्ष सहचारणीचा वसा,


चूल आणि मूल ही संकल्पना मोडीत काढलीस

आणि बघता बघता सर्व क्षेत्रात पारंगत झालीस,


घर आणि ऑफिस आता दोनी जग ती अचूक सांभाळते

पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन स्वतःची प्रगती करते,


स्वतःच्या सर्व कल्पना अस्तित्वात आणण्या कारण तू

आजच्या युगातील सर्वात सशक्त व्यक्तिमत्व तू,


आयुष्यातील खाचखळग्यांना कधीच घाबरली नाहीस

त्या वाटेला नवीन वळण देऊन पाठी कधी फिरली नाहीस,


अत्याचाऱ्याच्या बेड्या तोडून बनलीस तू लढाऊ धैर्यशील

तरी मायाळू,नम्र भावना जागृत ठेवलीस काळजातील,


वात्सल्याची मूर्ती तुझ्या ठाई आजही दिसते

स्वतःच्या प्रतिभेने स्वतःचे विश्व चमकवते,


शांत वाहणारी नदी तू,विशाल आकाश तू

आत्मसन्मानाची ज्योत तू,विश्वाची निर्मिती तू ,


राणीलक्ष्मीबाईची शक्ती तू,मिरेची आरक्त भक्ती तू

बहिणाबाईंची ओवी तू,गानसम्राज्ञीचा सूर तू,


तूच संजीवनी तूच मनस्विनी ईश्वराघरचे दान तू

संघर्षाची गाथा अन् महाराष्ट्राची शान तू,


सुदृढ समाजाचा पाया तू,

अवघ्या विश्वाची जननी तू,


तू लक्ष्मी तू सरस्वती तू दुर्गा सुद्धा

आजच्या जगाचा कायापालट करणारा अष्टपैलू तूच

तू तू आणि तू स्वयंसिद्धा .



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational