STORYMIRROR

Gaurav Daware

Inspirational

3  

Gaurav Daware

Inspirational

स्वतःचा उंबरठा...

स्वतःचा उंबरठा...

1 min
148

स्प्वप्नांच्या उंबरठ्यावर आज उठतच जावे

ध्यानी मनी चिंतन थोडं करून पाहावे

थोडे अबोल बोलके तिच्यापासून दूर व्हावे

गीत गात गात स्वतःसाठी आयुष्य जगावे....


अबोल व्यसणांना थोडं दुरवर फेकावे

अडचणीना हळुवार अल्पविराम दयावे

मनात येणाऱ्या प्रश्नांना मनातच मारावे

आज स्वतःसाठी पुन्हा आयुष्य खुळवून दयावे...


तिच्या आठवणींना दुरून हेका मारत न्यावे

अबोल असणाऱ्या उत्तरापुढे अबोलच व्हावे

प्रेमळ स्वभावला थोडं औषधपाणी दयावे

स्वतःसाठी आयुष्य आज पुन्हाही जगावे....


कर्तव्याना थोडे आज जास्त लांब न्यावे

प्रत्येकाला आयुष्यात वेळ किती द्यावे

निसर्गाच्या हाकेवर आज उंबरठ बसावे

मित्रांना तर काहीक्षण अल्पविराम ठोकावे....


निसर्ग भटकंती करत थोडे जास्त दूर जावे

समोरून येणाऱ्या वाघाला जवळून पाहावे

डोळ्यांना आज थोडे पक्षी निरखू दयावे

पुन्हा न येणाऱ्या क्षणाला आज एकदाच जगावे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational